शरद पवारांना धमकी, राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

राजकारण महाराष्ट्राचे असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी धमकी शरद पवार यांना देण्यात आली आहे.

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. तसंच शरद पवारांना काही झाल्यास त्या सगळ्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शरद पवार यांना धमकी आली असेल तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस याची कसून चौकशी करतील. ज्याने ही धमकी दिली ते शोधून काढूच.”

Leave a Comment