मंत्री विखे पाटलांनी संजय राऊतांची उडवली खिल्ली, म्हणाले….

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) तसंच त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना धमकी मिळाल्याचं समोर आलं.

याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातल्या प्रत्येक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाची असून आम्ही ते चांगल्या पद्धतीने करु,” असं विखे पाटील म्हणाले.

सोबतच ‘संजय राऊत हे स्वत:च स्वतला धमकी देतात,’ अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊत यांची खिल्ली उडवली. पंढरपूर (Pandharpur) इथे आषाढी यात्रा व्यवस्थापन पाहणीसाठी आले असता विखे पाटील बोलत होते.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊतांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा अन्यथा महिनाभरात तुम्हा दोघांनाही गोळ्या घालू, असं ही अज्ञात व्यक्ती म्हणाली.

राऊतांनी मुंबई पोलिसांना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मात्र धमक्या येऊनही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिलं नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

यावर संजय राऊत हे स्वत:च स्वत:ला धमकी देतात, अशा शब्दात विखे पाटील यांनी राऊतांची खिल्ली उडवली.

Leave a Comment