मुंबईत पाऊस कधी बरसणार ; हवामान खात्याने दिलीय मोठी अपडेट

मुंबईत पाऊस कधी बरसणार याबाबतची मोठी अपडेट भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिली आहे. मुंबईत आजपासून म्हणजे 23 जूनपासून पावसाचे आगमन होत आहे. मुंबईत आज काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे.

त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाचा शिडकावा अंगावर घेता येणार आहे. आजपासून पाऊस सुरू होणार असल्याने मुंबईकरांची जीवघेण्या गर्मीतून सुटकाही होणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत 23 ते 25 जून दरम्यान पाऊस होणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मुंबईत पाऊस लांबला आहे. मात्र, उशिरा का होईना आता पाऊस सुरू होणार असल्याने सर्वांना दिलासा मिळणार आहे.

हवामान खात्याने आजपासून मुंबईत पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला असला तरी हा अंदाज खरा ठरणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण निसर्गात कधी काय घडेल याचा काही भरवसा नाही. त्यामुळे हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरणार की नाही हे पाहावं लागणार आहे.

Leave a Comment