मला विरोधी पक्षनेतेपदामध्ये कोणताही रस नाही. मला संघटनेतील कोणतंही पद द्या, अशी मागणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती.
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा रोख प्रदेशाध्यक्षपदाकडे आहे का? अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षात कोणती जबाबदारी कोणाला द्यावी याचा निर्णय मी एकटा घेत नाही, पक्षातील सर्व नेते मिळून अजित पवारांच्या मागणीवर निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
