राज्यात दि.2 जुलैपासून पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असून मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भागात जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दि.4 व 5 जुलैपर्यंत सर्वत्र या प्रकारचा पाऊस सुरू राहील.
जुलैमध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्टमध्ये अलनिनो तीव्र होणार असले तरी हिंदी महासागरावर आयओडी देखील जुलैपासून पॉझिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर भागात दि.1 ते 4 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढेल. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार घाट माथ्यावर तीव्र पाऊस होईल.
कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर या भागात मुसळधार तसेच अतिमुसळधार पाऊस दि.2 ते 5 जुलैपर्यंत सुरु राहील.
