अन् काळाने डाव साधला.. पती – पत्नी व मुलीचा होरपळून मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गवर खाजगी बसला झालेल्या भीषण अपघातात तब्बल 26 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली.

याच अपघातात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांतील नवरा बायको व मुलीचा या अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. याबाबतेच वृत्त समजताच संपूर्ण निरगुडसर गावावर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात इंग्रजीचे विध्यार्थीप्रिय असलेले प्राध्यापक कैलास गंगावणे (वय 48 वर्ष) त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय 38 वर्ष) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20 वर्ष) या तिघांचाही अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पहाटे आल्यानंतर गंगावणे कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला.

मुळचे शिरूर येथील हे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने निरगुडसर येथे कार्यरत होते. येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात कैलास गंगावणे हे मागील 27 वर्ष ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांच्या दुर्दैवी निधनाच्या वृत्ताने संपूर्ण विद्यालयावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment