Karnataka News : नवरीने मेकअप केला अन् थेट ICU मध्येच दाखल…..वाचा कारण

Karnataka News : मेकअपमुळे चेहरा खराब होणं, ही काही नवीन बाब नाही. पण कर्नाटकात एका मुलीला स्वतःच्या लग्नात मेकअप करणं चांगलंच महागात पडलं. ब्युटी पार्लरमधून येताच तिचा चेहरा चांगलाच सुजला होता.

तिचा चेहरा इतका बिघडला की तिला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावं लागलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महिलेचा विद्रूप झालेला चेहरा पाहून नवरदेवाने लग्नाला नकार दिला आणि वरात तशीच परत गेली. दुसरीकडे पोलिसांनी पार्लरच्या ब्युटीशियनला ताब्यात घेतलं आहे. ही घटना कर्नाटकातील हसनमधील अर्सिकेरे शहरातील आहे.

10 दिवसांपूर्वी एका वधूने येथील ब्युटी पार्लरमधून तिचा मेकअप करून घेतला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे हर्बल ब्युटी पार्लर आहे. ब्युटी पार्लरच्या संचालकाने तिला नवीन प्रकारचा मेकअप दाखवला आणि तो करून घेण्यास सुचवलं. वधूला वाटलं की कदाचित तो चांगला होईल.

त्यामुळे ती हो म्हणाली. मात्र तिला अजिबातही कल्पना नव्हती की हा मेकअप तिला आयसीयूमध्ये पोहोचवेल. नववधूने सांगितलं की, हर्बल ब्युटी पार्लरच्या संचालिकेनं मेकअपसाठी नवनवीन प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर केला. त्यामुळे मेक-अप केल्यानंतर ऍलर्जी झाली.

घरी पोहोचल्यावर संपूर्ण चेहरा सुजला आणि काळा झाला. दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, वधूला तिच्या लग्नात काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे होते. फाउंडेशनच्या सुरुवातीच्या लेयरनंतर लगेचच तिने स्टीम मशीनमधून वाफ घेतली. काही वेळातच तिचा चेहरा काळवंडला आणि सुजला.

मेकअप ऍलर्जी एक प्रकारे IV ऍलर्जी आहे. हे फक्त तुमच्या त्वचेच्या त्या भागावर परिणाम करते जिथे कोणतंही ब्‍यूटी प्रोडक्‍ट लावलं गेलं आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या आयशॅडोमधील एखाद्या घटकाची ऍलर्जी असल्यास, तुमच्या पापण्या सुजल्या जातील. लक्षणं तुमच्या पापण्यांपर्यंतच मर्यादित असतील आणि तुमच्या शरीराच्या इतर भागांवर याचा परिणाम होणार नाही. अनेक सौंदर्य उत्पादनांमुळे तुमच्या चेहऱ्यावर ऍलर्जी होऊ शकते ज्यामुळे लालसरपणा, सूज आणि खाज सुटू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेवर हे ठरतं की त्याला कशाची अॅलर्जी होऊ शकते.

Leave a Comment