राज्याच्या १७ हजार शाळांबाबत शिक्षकांची नियुक्ती करण्याचा मार्ग आता मोकळा होणार असून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शिक्षकभरती गेले कित्येक वर्ष रखडलेली असताना फडणवीस-शिंदे सरकारने याबाबत कार्यवाही सुरु केली असून लवकरच राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
पहिल्या टप्प्यात ३० हजार भरती होईल, त्यानंतर उर्वरित २० हजार पदांसाठी शिक्षकभरती होणार असून या सर्व प्रक्रियेला महिनाभराचा अवधी लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार नाही तर कोर्टाच्या स्थगितीमुळे ही शिक्षक भरती प्रक्रिया रखडली होती, असेही केसरकरांनी यावेळी स्पष्ट केले.
