राज्यात अलो अलर्ट जारी, अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यात….

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

सोलापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळत अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment