कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याच्या जास्तीत जास्त भावात दोनशे रुपयांनी वाढ झाली.

भाव 1800 रुपयांपर्यंत निघाले. एकूण 62 हजार 885 कांदा गोण्या़ंची आवक झाली.

एक-दोन लॉटल 1600 ते 1850 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1350 ते 1550 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1150 ते 1300 रुपये,

गोल्टा कांद्याला 850 ते 1200 रुपये, गोल्टी कांद्याला 600 ते 700 रुपये, जोड कांद्याला 250 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 300 ते 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Leave a Comment