नाशिक – पुणे – नगरच्या रेल्वेचे मार्गाच काम कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले….

महाविकास आघाडी सरकारनं नाशिक-नगर-पुणे या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. पण सध्या हे काम रखडलं आहे. यावर बोलताना उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकल्पाचं काम नेमकं कुठे अडलंय? आणि कधी सुरु होणार? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

नाशिक इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अजित पवार म्हणाले, कालच चार्ज घेतला आणि त्यानंतर लगेचच हा प्रकल्प विकसित करणारी कंपनी महारेलचे अधिकारी जैस्वाल यांना मी बोलावून घेतलं होतं.

त्यांच्याकडून सगळं समजावून घेतलं. हे काम रेल्वे मंत्रालय दिल्लीत थांबलेलं आहे. रेल्वेची स्वतःची कामी मतं आहेत. त्यामुळं हा प्रकल्प रखडला आहे. पण याबाबत मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करावी लागणार आहे. कारण रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं असं आहे की, हा प्रकल्प आम्हाला देण्यात यावा.

आपण महारेल या वेगळ्या कंपनीमार्फत हा प्रकल्प राबवणार होतो. कारण नाशिक-नगर-पुणे या सर्वांना जोडणारा ही महत्वाची रेल्वे लाईन आहे. त्यातून सर्वांनाच मदत होणार आहे. मी आता याच्या पाठीमागं लागणार आहे. हा प्रकल्प कोणी करायचा? याबाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर हा विषय संपवून जमीन अधिग्रहन सुरु करावं लागेल.

Leave a Comment