मुंबई : पावसाळी अधिवेशन 17 जुलैला सुरू होणार आहे. मात्र याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही खाती वर्ग करण्यात आली आहे. ही सर्व खाती शिंदे गटाच्या आमदारांनाच देण्यात आली आहे. सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे या मंत्र्यांकडून दिली जाणार आहेत.
कोणाकडे कोणत खातं?
गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खातं देण्यात आलं आहे.
