सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे. परंतु, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत जरी असला तरी काळजी करायचे कारण नाही. कारण सप्टेंबर ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल.
सर्व धरणे तळे हे कमी वेळात भरून निघतील, असे मत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पंढरपूरमध्ये व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले पंजाबराव डख?
पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांच्या ऊस परिसंवाद या कार्यक्रमात पंजाबराव डख हे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस जोरदार सुरू असला आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सध्या तरी कमी आहे.
परंतु, काळजी करायचं कारण नाही. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल आणि सर्व धरणे तळे भरून निघतील, असा विश्वास पंजाब डख यांनी व्यक्त केला.
