नगरकरांचे जीव धोक्यात ; भेसळयुक्त खवा आणि तेल बनवनारी टोळी कार्यरत, प्रशासन मात्र झोपलेले?

अहमदनगर(DSNews24/सुनिल नजन) जिल्ह्यातील अनेक गावात घरी गाया म्हशी नसतानाही हजारो क्विंटल भेसळयुक्त खवा जिल्ह्यात राजरोसपणे विकला जात आहे.सर्व सामांन्य माणसाच्या जिवाशी खेळत खवा माफिया गब्बर झाले आहेत. आणि आमचे अन्न ,औषध भेसळीवर लक्ष ठेवणारे प्रशासन मात्र गेंड्याची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेऊन झोपी गेलेले दिसत आहे.अनेक गावात लग्नासाठी, खाजगी कार्यक्रम, रिशेप्शन पार्टीत,मोठमोठे हाँटेल येथे हा दुधाचा वापर न करता केमिकल भेसळयुक्त तेल,साखर,डिटर्जंट पावडर, आणि वेगवेगळ्या पावडरचा वापर करून बनवलेला खवा सर्वत्र विकला जात आहे. याचे प्रमुख केंद्र शेवगाव-पाथर्डी, नेवासा, कर्जत, जामखेड, राहुरी, आष्टी, आणि श्रीरामपूर या तालुक्यात आहे.

दारात दुध देणारी जनावरे नसतात ही डांबरी रस्त्याच्या कडेला बसून भेसळयुक्त खवा विकला जात आहे. तसेच वरील तालुक्यातील अनेक गावात भेसळयुक्त खवा तयार करणारे मोठे रँकेट असुन या गोरख धंद्यात राजकीय पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आणि ताटाला ताट लावून एका पंक्तीत बसून उष्टे खाणाऱ्या बोगस कार्यकर्त्यांचा समावेश आहे. खवा विक्री करणाऱ्या महाठकाचे जिल्ह्यात फार मोठे नेटवर्क जाळे आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा जेवढा लागेल तेवढा खवा उपलब्ध करून दिला जात आहे. गुलाबजाम, बासुंदी,आणि पेढे, बनवण्यासाठी या भेसळयुक्त खव्याचा वापर केला जात आहे.

जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या अनेक देवस्थानच्या समोर बसून या भेसळयुक्त खव्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या मिठाईची विक्री केली जात आहे. जिल्ह्यातील भाविकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण खरेदी करत असलेली मीठाई भेसळयुक्त केमिकल पासून बनवलेल्या खव्याची तर नाही ना याची खात्री करूनच खव्याचे पदार्थ खरेदी करून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे.

अंन्यथा बैल गेला आणि झोपा केला अशी म्हणण्याची वेळ येईल. आज भेसळयुक्त खव्याचे पदार्थ खाउन अनेक जण विनाकारण दवाखान्यात डॉक्टरांची बीले भरताना दिसत आहेत. अनेक पँकिंग केलेल्या पिशव्यातून या केमिकल युक्त दुधाची विक्री केली जात आहे.

हे भेसळयुक्त दुध बनविण्यासाठी पाथर्डी तील भेसळयुक्त तेलाचा वापर केला जात आहे. या जिल्ह्यातील एका देवाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलाचा पुन्हा फिल्टर करून वापरून पिशव्यातून पँकिंग करून विक्री केली जात आहे.आणि आमचे किराणा दुकानदार ही स्वस्त म्हणून या तेलाची खुलेआम विक्री करत आहेत.

Leave a Comment