संगमनेर (DSNews24/किरण पुरी) भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी सक्षम लोकशाही आहे आजचा तरुण हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. तरुणाची शक्ती विधायक मार्गाने वळविल्यास भारत हा देश जागतिक महासत्ता देश होवू शकेल यासाठी प्रत्येक तरुणांनी मतदार होण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडुन आपला मदानाचा हक्क बजवावा असे प्रतिपादन संगमनेर नायब तहसिलदार संदिप भांगरे यांनी केले. ते संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालयात नव मतदार नोंदणी अभियानात बोलत होते.
रमेश फिरोदिया महाविद्यालय निवडणूक साक्षरता मंच व महसूल- विभाग युवा संवाद यांच्या संयुक्त विदयमाने नव मतदार नोंदणी अभियान आयोजित केले होते.
यावेळी व्यासपीठावर संगमनेर कृषी उत्पन्न बजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपकजी फिरोदिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन घोलप, उपप्राचार्य रणजित गिरी, मंडल अधिकारी इरप्पा काळे, कामगार तलाठी आप्पा वैद्य, विशाल पाबळ, आप्पा शिरोळे नोडल अधिकारी प्रा. जया रक्टे प्रा. संदिप खेमनर उपस्थित होते.
नायब तहसीलदार संदीप बांगरे यांनी विद्यार्थ्यांना महसूल विभागातील विविध योजनांची माहिती त्यामध्ये आपले सरकार अंतर्गत मिळणारे दाखले, ई-पीकपाहणी, ई- चावडी, ई-हक्क, याचबरोबर नव मतदार नोंदणी प्रक्रिया सादरीकरणाद्वारे उत्तमपणे समजावून सांगितली व जास्तीत जास्त युवक व युवतींनी व साकुर पठार तसेच पंचकोशीतील नागरिकांनी नोंदणी करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शंकरराव पा. खेमनर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विदयार्थ्यांनी मतदार अभियानामध्ये आपली नोंदणी करून, आपल्या सभोवतालच्या तरुण वर्गाची नोंदणी करावी व त्यांना आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सिद्ध करावे
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप म्हणाले की, आपला देश हा सक्षम लोकशाही असलेला देश आहे. ही लोकशाही टिकवून ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. यासाठी विवेकपूर्ण मतदार बनणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांचे प्रबोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार नाव नोंदणी करावी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील १८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ९० विद्यार्थ्यांनी नव मतदार म्हणून नाव नोंदणी केली. महाविद्यालयामध्ये नव मतदारांसाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.गणेश कुलकर्णी, प्रा.कल्पना शेळके प्रा. पोपट खेमनर, प्रा. प्राजक्ता बिडवे, प्रा.पुजा वलवे, प्रा.गणेश साळुंके, प्रा.योगेश साळुंके, प्रा.शंकर राशिनकर, प्रा.लक्ष्मण कातोरे, प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा. स्वाती ढोकरे, प्रा.प्रियंका हाके, प्रा.शबाना शेख, प्रा.स्वाती सागर. प्रा.शिरसाट, श्री.मनोहर दुरगुडे, श्री.पुंजाहरी वारे, श्री.लक्ष्मण जाधव, बहिरट व सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य रंजित गिरी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.म्हतु खेमनर यांनी केले तर आभार प्रा.दत्तात्रय आसवले यांनी मानले.
