मुळा पाणलोटात कमी अधिक पाऊस होत असल्याने आवकही कमी अधिक होत आहे. असे असलेतरी 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सायंकाळी 19244 दलघफू (74टक्के) झाले असून आज रात्री उशीरापर्यंत 75 टक्के भरण्याची शक्यता आहे.
अकोले, राहुरी, नेवासा, शेवगाव, नगर, पाथर्डीच्या शेती, पिण्याचे पाणी, व्यापार तसेच नगरची एमआयडीचे भवितव्या मुळा धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असल्याने या धरणातील पाणीसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते.
या हंगामात मुळा धरणात केवळ 10502 दलघफू पाणी नव्याने दाखल झालेले आहे. गतवर्षीचा पाणीसाठा बर्यापैकी साठा असल्याने धरणातील पाणी 75 टक्क्यांवर आज जात आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 19105 दलघफू (74टक्के) झाला होता.
