अमित शहा यांची गुप्त भेट घेतली? ; जयंत पाटील म्हणाले भेट झाल्याचा…..

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात तासभर खलबतं झाली असून पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या सर्व चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. माझी कुणाशीही भेट झाली नाही. भेट झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? असा सवाल करतानाच मी काल, आज आणि उद्या शरद पवार यांच्यासोबतच आहे, असं सांगत जयंत पाटील यांनी शाह यांना भेटल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्याबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. कुणाशाही माझा संपर्क झालेला नाही.

अशा बातम्या पेरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

Leave a Comment