माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खासगीत मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी खासगीत याबाबतचं वक्तव्य केलं आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे.
वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलणार, असं उद्धव ठाकरे खासगीत म्हणाले आहेत.
