भूमि अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा दि. 17 ऑगस्ट ते दि.14 सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत.
परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून, पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान 10 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे.
तर परीक्षेचे प्रवेशपत्र आणि केंद्र तीन दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. याबाबत भूमि अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी माहिती दिली. राज्यभरातून तलाठी पदाच्या 4 हजार 466 या पदासाठी 11 लाख 10 हजार 53 उमेदवार बसणार आहेत.
या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असेल. सकाळी 9 ते 11, दुपारी 12 :30 ते 2:30 आणि सायकाळी 4:30 ते 6:30 या वेळांचा समावेश आहे.
उमेदवारांना परीक्षेचे गाव आणि ऑनलाइन अगोदर समजणार असून, परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस अगोदर हॉल तिकीटाबरोबरच दिसणार आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यात येणार असून टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
असे आहे वेळापत्रक
पहिला टप्प्पा- दि. 17 ते 22 ऑगस्ट
दुसरा टप्पा- दि. 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर
तिसरा टप्पा- दि.4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर
