संगमनेर तालुक्यातील खांबे येथील जिल्हा परिषद शाळा न्याहारवाडी येथे आदिवासी बांधवांच्या स्वयंप्रेरणीतून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी बांधवाकडून सामाजिक बांधिलकीचे भान जपत शाळेसाठी 22000 रुपये किमतीचा स्मार्ट टीव्ही मिशन आपुलकीअंतर्गत भेट देण्यात आला. तसेच शाळेत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी वेशभूषा सादर केल्या. सदर प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदिवासी बांधवांकडून शाळेतील मुलांना मिष्ठांना भोजनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी खांबे गावचे सरपंच रविंद्र दातीर, उपसरपंच भारत मुठे, व ग्रामपंचायत सदस्य तसेच न्याहारवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक केंद्रप्रमुख श्री बोरे सर यांनी, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री सय्यद सर यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन श्री सरोदे सर यांनी केले.
