ब्रेकिंग! पाकिस्तानला मिळाला काळजीवाहू पंतप्रधान

Pakistan : बलुचिस्तान अवामी पक्षाचे सिनेटर अन्वर उल हक कक्कर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे, असे पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) शनिवारी सांगण्यात आले.

पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते (NA) राजा रियाझ यांनी आज झालेल्या बैठकीत काळजीवाहून पंतप्रधान म्हणून कक्कर यांच्या नावावर एकमती दर्शवली. त्यानंतर पीएमओकडून अन्वर उल हक कक्कर यांची नावाची घोषणा करण्यात आली. (Pakistan)

पीएमओने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शाहबाज शरीफ आणि रियाझ यांनी कक्कर यांच्या काळजीवाहू पंतप्रधानपदी नियुक्तीबाबतची शिफारस राष्ट्रपती अल्वी यांच्याकडे केली आहे.

पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्यानंतर राजकीय उलथापालथींना वेग आला होता. दरम्यान, नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी सांगितले की, अन्वर-उल-हक कक्कर यांची पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment