Tomato : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरानं उच्चांक गाठल्यानं आहारातून टोमॅटो गायब झाले होते. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.
मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर 200 रुपये किलोवरून 40 ते 45 रुपये प्रति कोलोवर पोहोचले आहेत.
दरम्यान आगामी काळात टोमॅटोचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे.लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते.
याचा सर्वाधिक फटका हा मध्यवर्गीय लोकांना बसला तर टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले. मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 150 ते 200 रुपये प्रति किलो दरानं मिळणारे टोमॅटो आता 40 ते 45 रुपये किलोनं मिळत आहेत.
भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.दरम्यान आगामी काळात नवीन टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होणार आहेत.
नवीन टोमॅटो बाजारात दाखल झाल्यानंतर आवक वाढून टोमॅटोचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
