पुणे – नाशिक महामार्गावरुन अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. नारायणगाव बायपासला प्रवाशांनी भरलेल्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडलीय.
पुण्याहून नाशिकच्या दिशेने शिवशाही बस जात असताना नारायणगाव बायपास येथे समोरून एक दुचाकी वेगात आली. समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना मागून एक कंटेनर समोर आला. यामध्ये शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातात १४ प्रवासी किरकोळ जखमी झालेत.
सुदैवाने अपघातात मोठा अनर्थ टळलाय. परंतु हा अपघात इतका भीषण होती की, शिवशाही बसचे दरवाजे अचानक लॉक झाले. आतील प्रवाशांना बसची समोरची काच फोडून बाहेर काढण्यात आलय. सध्या जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
