राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता दोन्ही गटाने पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. अजित पवार आणि शरद पवार या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आता आपल्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.
सुरूवातीला अजित पवार गटाने आपल्या ९ मंत्र्यांकडे राज्यातील जिल्ह्यातील जबाबदारी दिली आहे. यातच आता शरद पवार गटाने देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांची नेमणुक केलीय.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेने व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राज्यभरातील जिल्हा प्रभारी म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत.
यामध्ये अनिल देशमुख यांच्याकडे अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, तर एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव, धुळे, नांदगाव, बुलढाणा, तर राजेश टोपे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ठाणे आणि बीड जिल्हाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, प्राजक्त तनपूरे यांच्याकडे नाशिक, अहमदनगर, अशोक पवार यांच्याकडे पुणे, रोहित पवार यांच्याकडे रायगड, भंडारा, गोंदिया, तर सुनिल भुसारा यांच्याकडे पालघर, हिंगोली, नांदेड, गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
