पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी आज खूप मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर दरात मोठी कपात केली आहे.
त्यामुळे आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
त्यामुळे आता देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या आधी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना फायदा होणार आहे.
