मराठा समाजाचा इशारा, देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नाही तोपर्यंत…….

‘जालन्यात मराठा समाजाला ज्या प्रकारे मारलं गेलंय, आई बहिणींवर लाठी हल्ला केलाय. ते बघून कोणताही समाज शांत बसू शकत नाही. आम्ही रविवारपासून आंदोलनांची मालिका सुरू करणार असून जोपर्यंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

मराठा समाचाचे नेते अॅडव्होकेट विरेंद्र पवार आणि अॅडव्होकेट प्रशांत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

जालन्यात मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मराठा संघटनांकडून रविवारी मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. दादर येथील प्लाझा सिनेमासमोर हे आंदोलनं केले जाणार आहेत. ‘लाठीहघटनेचा निषेध करण्यासाठी मराठा संघटनां रविवारी मुंबईतील दादर येथे आंदोलन करणार आहेत.

प्लाझा सिनेमा समोर आंदोलन केले जाणार आहे. उद्या महाराष्ट्र मराठा समाजाचं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन बघेल. जो मराठा समाज आतापर्यंत शांततेने मुक आंदोलन करणारा समाज होता. तो आता वेगळ्या प्रकारे ताकदीने निदर्शन करू शकतो ते दाखवून देणार आहोत. काल ज्या प्रकारे मराठा समाजाला मारलं गेलंय त्यामुळे रोष कमी होत नाहीए. 24 तासानंतरही हा समाज शांत होत नाहीए.

कारण नसताना मराठा समाजाची छेडछाड करण्यात आली आहे. आई बहिणींवर लाठीहल्ला करण्यात आलाय. असं होत असेल तर कोणताही समाज शांत बसू शकत नाही. उद्या जे आंदोलन असेल मुला बाळांसकट, वृद्ध महिलांसकट आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. उद्या जी आंदोलनाची मालिका आम्ही सुरू करणार आहोत. त्याची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. जोपर्यंत फडणवीसांचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार, असा इशारा मराठा समाजाचे नेते अॅडव्होकेट विरेंद्र पवार यांनी दिला आहे.

Leave a Comment