Sucide : बिरेवाडीत १६ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर – तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन युवकाने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या(sucide) केल्याची घटना मंगळवार दि. ७ मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे.

दिपक गोरख केदार ( वय १६ ) रा. बोंबलदरा, चिकलठाण राहुरी फॅक्टरी ता. राहुरी असे मयत युवकाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, राहूरी तालुक्यातील बोंबलदरा, चिकलठाण राहुरी फॅक्टरी या ठिकाणाहून साकूर परिसरात उदरनिर्वाहासाठी गोरख अंजाबापू केदार यांचे कुटुंब आले होते. त्यांच्या समवेत पत्नी अलका केदार, मुलगा संदिप गोरख केदार त्याची पत्नी चित्रा संदिप केदार व मुलगा दिपक गोरख केदार हे बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळील वैभव दत्तात्रय सागर यांच्या गट ंंनं ३६३ या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. मंगळवार दि. ७ मार्च रोजी सकाळी गोरख केदार, अलका केदार, संदिप केदार, चित्रा केदार हे चौघेजण बाहेर कामाला गेले होते. दिपक केदार हा एकटाच घरी होता. वडील घरी आल्यावर दिपक गळफास अवस्थेत दिसला.

सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पो कॉ बिरे, पो कॉ. चव्हाण, पो कॉ बांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवत शवविच्छेदनासाठी कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. दिपक लहानपणापासूनच मुकबधीर असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र नेमकी आत्महत्या का केली हे कारण अस्पष्ट आहे.

Leave a Comment