महाराष्ट्रात 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, अहमदनगर, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मोठा अलर्ट

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच या पावसाचा रब्बी हंगामाला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय हवामान खात्याने राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. या सोबतच राज्यात नऊ आणि दहा तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.

दरम्यान , मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट ण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे, ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. तसेच, कोकण, गोवा, मुंबई आणि पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. तर राज्याच्या संपूर्ण विभागात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment