शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये 14 सप्टेंबरला आमदारांच्या अपात्रतेबाबत मॅरेथॉन सुनावणी होणार आहे.
एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी घेणार आहेत, त्यामुळे शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखाली येणार आहेत.वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.
यानंतर प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे, त्यावेळी संबंधित आमदारांना बोलावलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदारांना आपलं म्हणणं मांडायला संधी मिळणार आहे.
मग पुढे आमदार आपले पुरावे सादर करतील, तसंच एकमेकांना पुराव्याचे पेपरही देतील. यानंतर विधिमंडळ सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर याचिकेचं वेगळं इश्यू फ्रेम करेल.
विधानभवनात 14 सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार असून प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाणार आहे.सुप्रीम कोर्टाने निकालामध्ये विधिमंडळातील शिवसेना पक्ष कोण? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.
