दोन आमदार अपात्र होणार? शरद पवार गटाने खेळला मोठा डाव 

पुण्यातील दोन आमदारांचं भवितव्य टांगणीला लावणारी ही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपात्र आमदारांच्या पाठवलेल्या यादीत पुण्यातील दोन आमदारांचा समावेश आहे.

सुनील टिंगरे आणि चेतन तुपे या दोन आमदारांची नावे आहेत. त्यामुळे या दोन्ही आमदारांची आमदारकी जाणार की राहणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, त्यावर चेतन तुपे यांनी याबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र अजितदादांसोबत असल्यानं अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment