माजी मंत्री आणि शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत मला माहित नाही. मी अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे.
2009 ला त्यांच्याच आशीर्वादाने मी निवडून आलो. शिवसेनेत परत यावे हे उद्धव ठाकरे यांच्या आणि माझ्याही मनात होतं. पुन्हा शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या आदेशाने मी कामाला सुरुवात केलीय.
उद्धव ठाकरेंचा आदेश शिरसावंद्य मानून भविष्यात वाटचाल सुरू राहणार अशी प्रतिक्रिया माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली
