टोमॅटोच्या दरात मोठी घसरण….

पुणे : पंधरा ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना टोमॅटोला प्रति किलो १५० ते २०० रुपये दर मिळत होता. तो आता पाच ते सात रुपयांवर आला आहे. बाजार समित्यांमधून मागणीच नसल्यामुळे शेतकरी टोमॅटो रस्त्यांवर फेकून देत आहेत. टोमॅटो अक्षरक्ष: कवडीमोल दराने विकला जात आहे. संपूर्ण जून, जुलै महिना आणि पंधरा ऑगस्टपर्यंत देशभरात टोमॅटोचे दर चढे होते.

शेतकऱ्यांना सरासरी १५० ते २०० रुपये दर मिळत होता. केंद्र सरकारला नेपाळमधून टोमॅटो आयात करावी लागली. केंद्राला सरकारी यंत्रणेमार्फत टोमॅटो खरेदी करून राजधानी दिल्लीत विकावा लागला. तोच टोमॅटो केवळ पंधरा दिवसांत कवडीमोल झाला आहे.

पंधरा ऑगस्टपासून टोमॅटोच्या दरात घसरण सुरू झाली होती. दर वेगाने कोसळले आहेत. शेतकऱ्यांना आता पाच ते सात रुपये प्रति किलो दर मिळत आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना १५ ते २० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो मिळत आहेत.

Leave a Comment