साकूरकरांनो सावधान, ‘या’ गावात रात्री घडलाय भलताच प्रकार

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील रणखांब गावातील तीन घरांचे कडी,कोयंडा,कुलूप तोडून घरात प्रवेश करत उचका_पाचक करून त्यात मौल्यवान वस्तू, रोख रक्कमेसह एकूण एकोनसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल गुंडाळून अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना गुरूवार दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताचे नंतर ते शुक्रवार दि.१५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली आहे. या चोरीच्या घटनेने चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली असून संपूर्ण गाव भितीच्या छायेत गेले आहे.

रणखांब गावातील तीन घरांचे कडी,कोयंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश करत उचका_पाचक केली आहे.यात शेतकरी किसन भागाजी गुळवे यांचे पाचशे रुपये चलनी नोटांचे दहा हजार रूपये रोख रक्कम व वीस हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, अंगठी, डोरले,लहान मुलांचे दागिने चोरी झाले आहे. साहेबराव विष्णू गुळवे यांचे घरातून पाचशे रुपये चलनी नोटांचे नऊ हजार रुपये चोरी झाले आहे.

तर सुंदरबाई नारायण बिबवे यांचे घरातून विस हजार रुपये किमतीची अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरी झाली आहे.असा एकूण एकोंणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल गुंडाळून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे.

या प्रकरणी किसन भागाजी गुळवे यांचे फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शन नुसार डी एम चौधरी करत आहे.

तालुक्याचा पठार भागात गेल्या दोन वर्षांपासून अनेक चोरीच्या, दरोड्याच्या घटना घडल्या आहेत.त्यातील विविध चोरीच्या, दरोड्याच्या गुन्ह्यांचा योग्य तपास करत अनेक गुन्ह्यांचा उलगडा करत त्यातील दरोडेखोर,चोर भांबटे आरोपी जेरबंद देखील करण्यात पोलिस प्रशासनाला यश देखील आले आहे.परंतु या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्याचा शेतमाल जळून नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तर भविष्यात पाऊस न झाल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट ओढावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यादरम्यान पठार भागात पुन्हा एकदा घरफोड्या, शेतकऱ्याचे शेती उपयोगी साहित्य चोरी, मोटर सायकल चोरीच्या घटनांन मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. चोरांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याने चोरीच्या घटनांचा आलेख वाढता असल्याचे चित्र दिसू लागले आहे. घारगाव पोलिस प्रशासनाला पुन्हा एकदा कंबर कसून चौकशी करावी लागणार आहे.या चोरांचा सुळसुळाट मोठया प्रमाणात वाढता आहे. योग्य पद्धतीने तपास करतं या चोरांच्या मुसक्या आवळून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यावा अशीच मागणी पठार भागातील नागरिक करत आहे.

Leave a Comment