राहुरी : शनिवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 8 हजार 309 कांदा गोण्याची आवक झाली.
एक नंबरचा कांदा 1 हजार 905 रुपये ते 2 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 405 रुपये ते 1 हजार 900 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1हजार रुपये 400 रूपये भावाने विकला गेला.
गोल्टी कांद्याला 1 हजार 200 ते 1 हजार 700 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 26 कांदा गोण्यांना 2 हजार 600 रुपये रूपये भाव मिळाला.
