राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) मंगळवारी 2600 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला.
कांद्याच्या 10806 गोण्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 2000 ते 2600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 1950 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 400 ते 1200 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1200 ते 1700 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 ते 400 रुपये भाव मिळाला.
