शिवसेना आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांच्या दिरंगाई कामकाजावरून सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारत एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर काल तातडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिल्लीत कायदेशील सल्लामसलत करून पुढची रणनिती ठरवल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
आमदार अपात्रतेबाबत अध्यक्ष दिरंगाई करत असल्याचं सांगत ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी घेत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्याची मुदत दिली.
त्यावर काल विधानसभा अध्यक्ष दिल्लीला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर २५ सप्टेंबरला आमदार आपात्रतेबाबत पुढची सुनावणी विधानसभा अध्यक्ष घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून विधानसभा अध्यक्षांनी रणनीती ठरवली आहे. केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून या केसमध्ये काम करायचं आहे. याची आठवण सुप्रिम कोर्टाने मागच्या सुनावणीत केली होती.
त्यामुळे सोमवारच्या सुनावणीत कशा पद्धतीने कार्यवाही होते आणि पुढची तारीख विधानसभा अध्यक्ष काय देतात याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
