संगमनेर : राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी साकूर येथील रहिवासी असलेले नाजीम मोहमंद राजे यांच्या मालकीची ३ लाख रुपये किंमतीची महेंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी चोरून नेल्याची घटना वार – बुधवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे साकूर परिसरात खळबळ उडाली आहे.
घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजीम मोहमंद राजे हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत साकूर येथील पटेल गल्लीत राहत असून ते शेती करतात. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी संगमनेर येथून महिंद्रा कंपनीची बोलेरो प्लस बोलेरो गाडी नं एम. एच १५ सीडी ७८९१ ही गाडी विकत घेतली होती.
तसेच सदर गाडी ते कामासाठी वापरत होते. मंगळवार दि ७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सदर बोलेरो गाडी ते कामासाठी घेऊन साकूरला गेले होते. तसेच त्यांनी सदर बोलेरो गाडी साकूरमधील सरकारी दवाखान्यासमोर दिवसभर उभी केली होती. त्यांचे काम संपल्यानंतर बोलेरो गाडी घरी घेऊन गेले व रात्री ८.३० वाजता घरासमोर गाडी लॉक करून लावली.
तसेच जागने की बडी रात असल्याने नाजीम मोहमंद राजे हे रात्री १० वाजता साकूर गावात पायी गेले होते. रात्री १२.१५ वाजता ते पुन्हा घरी आले असता गाडी घरासमोरच होती. परंतु वार – बुधवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ते घराबाहेर आले असता त्यांना सदर गाडी लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. सदर गाडीचा साकूर परिसरात शोध घेतला मात्र गाडी कोठेही मिळून आली नाही.
या घटनेबाबत नाजीम मोहमंद राजे रा. पटेल गल्ली, साकूर ता. संगमनेर, जि. अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगाव पोलिस करत आहे.
