बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक( Satish Kaushik) यांचं निधन झाल आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
सतीश कौशिक हे कॉमेडी अभिनयासाठी प्रसिद्ध होते. अभिनयासह कौशिक यांनी दिग्दर्शन आणि चित्रपटांचा निर्माता म्हणून देखील बॉलिवूडमध्ये आपले योगदान दिले.
कौशिक यांच्या जाण्यानंतर बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक दिग्गजानी कौशिक यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली.
कौशिक यांनी मिस्टर इंडियामध्ये केलेली कॅलेंडरची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यासोबतच सलमान खानच्या तेरे नाम या सुपरहिट चित्रपटाचे कौशिक यांनी दिग्दर्शन केले होते.
