छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे, खळबळजनक दावा 

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक दावा माजी आमदार रमेश कदम यांनी केला.

रमेश कदम यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कदम तुरुंगात होते.

रमेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना हा खळबळजनक वक्तव्य केले. रमेश कदम यांनी म्हटले, छगन भुजबळ शरद पवार यांना जेल मधून ब्लॅक मेल करायचे.

जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देत भुजबळ त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा दावा कदम यांनी केला.

छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्याशी भेट होत असे. त्यावेळी भुजबळ हे पवार साहेबांनी मला मदत केली पाहिजे. जामिनाला खूपच उशीर होत आहे असं म्हणत नाराजी बोलून दाखवायचे, असेही कदम यांनी म्हटले.

Leave a Comment