मोठी बातमी! नगरमध्ये गौतमी पाटीलसह ५ जणांवर गुन्हा दाखल 

अहमदनगर : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना सणवार असले की चांगलाच उत्साह येतो. तिला पाहण्यासाठी चाहतेही सगळे चाहतेही आतुर असतात. गौतमीचे कार्यक्रम आणि होणारे राडे हे समीकरण ठरलेलंच आहे.

गौतमीच्या कार्यक्रमावेळी तिच्या अतिउत्साही चाहत्यांकडून ठिकठिकाणी गोंधळ होतो. हीच परिस्थिती लक्षात घेता अहमदनगरमधील सावेडी उपनगरातील गौतमीच्या कार्यक्रमाला तोफखाना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही याठिकाणी गौतमीचा कार्यक्रम घेण्यात आला. आता यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण जाणून घ्या.

पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही गौतमी पाटीलचा अहमदनगर येथे सावेडी उपनगरात कार्यक्रम झाला. याठिकाणी मृत्युंजय युवा प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळाच्यावतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदनगर शहरातील यशोदा नगर पाईपलाईन रोड सावेडी येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पण गौतमीच्या या कार्यक्रमाला अहमदनगर शहरातील उपनगर भागामध्ये पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तशी नोटीस पोलिसांनी गौतमी पाटील आणि स्वीय सहाय्यक अशोक खरात यांच्या सह सावेडी उपनगरात मृत्युंजय युवा प्रतिष्ठान राहुल सांगळे आणि एकदंत मित्र मंडळाचे कैलाश नाकोडे आणि हर्षल भागावर यांच्यावर तोपखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील यशोदा नगर पाईपलाईन रोड सावेडी येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तोफखाना पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती आणि तशी नोटीसही गौतमी पाटील आणि मंडळाचे अध्यक्ष ना देण्यात आली होती. पण परवानगी नाकारून गौतमीचा कार्यक्रम झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment