नगर दक्षिण मतदारसंघात विखेंविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला? ‘हे’ नाव समोर 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री शंकरराव गडाख आणी सुजय विखे पाटील आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे बघीतलं जातं आहे.

या मतदारसंघात सुजय विखे यांचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे आणी शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख यांची 1991 साली झालेली लढत लक्षवेधी ठरली होती.

त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून, याबाबत शंकरराव गडाख यांना खासदार संजय राऊत यांच्याकडून विचारणा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Comment