महागाईचा मोठा धक्का ; गॅस सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी महागले

ऑक्टोबर महिन्यात दसरा, नवरात्र असे सण साजरे केले जाणार आहेत. या दरम्यान या महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

आजपासून, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

नवीन दर रविवारपासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत. दरम्यान या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जात आहे.

दरम्यान ऑक्टोबर महिन्याची सुरूवातच महागाईत वाढीसोबत झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नवरात्र यासारखे उत्सव साजरे केले जातात, मात्र यापूर्वीच कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे. दिल्ली, कोलकता, चेन्नई या ठिकाणी ही दरवाढ लागू असणार आहे.

Leave a Comment