भीषण अपघात ; गाढ झोपेत असताना ट्रकने १० मजूरांना चिरडले

बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावर खामगाव – मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महामार्गाच्या बाजूला झोपलेल्यांना ट्रकने चिरडले आहे.

अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहे. रस्त्याच्याकडेला झोपलेले सर्व मजूर होते. जखमी मजुरांवर मलकापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची पोलिसांना शंका व्यक्त केली आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून महामार्गावर कामासाठी आलेले होते.

पहाटे साडे पाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातात प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशी तीन मृतांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment