राधाकृष्ण विखे पाटील आता ‘या’ नवीन जिल्ह्याचे पालकमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री सचिवालयाकडून ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांच्या जागी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बनवण्यात आलंय.

चंद्रकांत पाटील यांना अमरावती व सोलापूर जिल्ह्याच पालकमंत्री पद देण्यात आलं आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असेल.

तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे आता नव्याने अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असणार आहे.

 

सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर – चंद्रकांत पाटील

अमरावती – चंद्रकांत पाटील

भंडारा – विजयकुमार गावित

बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

बीड – धनंजय मुंडे

परभणी – संजय बनसोडे

नंदूरबार – अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Leave a Comment