संगमनेर(DSNews24) तालुक्यातील साकुर येथील नाभिक समाजाचे श्री. विजय नानासाहेब जाधव यांचे वडील कै. नानासाहेब भागूजी जाधव यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे ३: ३० वाजता दुखःद निधन झाले आहे. त्यांनी आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात सामाजिक कार्यात मोलाचं योगदान दिल आहे.
तसेच त्यांनी जांबुत ग्रामपंचायतीचे काही काळ उपसरपंचपदही भूषविले आहे. त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायातून साकूर पठारभागात अनेक स्नेहबंध जोडले होते.
नानासाहेब जाधव यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात गावपातळीवर मोठं योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी त्यांचे लहाने बंधू ह.भ.प. स्व.भिकाजी महाराज जाधव यांचेही ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. तेही पारनेर, संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध किर्तनकार होते.
