तरच अजित पवार मुख्यमंत्री होणार….

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कळवणला शेतकरी कृतज्ञता मेळावा पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर काय करावे लागेल याबाबत कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक सल्ला दिला आहे…

यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, आम्ही सत्तेत का गेलो याचे कारण वारंवार संगितले जाते.आम्हीच नाही तर तुमच्यासोबत (शरद पवार गट) असलेल्या अनेक लोकांनी तेच सांगितले.

सगळे आमदार आणि खासदार आमच्यासोबत आहेत. एक आमदार ३ लाखांचा प्रतिनिधी आहे. न्यायाचा तराजू अजितदादांच्या बाजूनेच सुटणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४५ आमदारांचे संख्याबळ आहे.

ते वाढवून आपल्याला ८० ते ९० आमदार वाढवावे लागतील. त्यानंतरच अजितदादा मुख्यमंत्री होतील. त्यामुळे जिथे-जिथे निवडणुका होतील तिथे-तिथे अजितदादांचे लोक निवडून आले पाहिजेत. त्याची जबाबदारी आता तुम्हाला-मला उचलायला पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Comment