हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक

साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शनिवारी अहमदनगर शहरातील रासने नगर या भागात हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता.याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हेरंब कुलकर्णी ज्या महाविद्यालयात मुख्याधापक आहे त्या महाविद्यालयाभोवती अक्षय सब्बन या आरोपीची अतिक्रमण करून टाकण्यात आलेल्या पान टपरीबाबत कुलकर्णी यांनी महानगरपालिकेत अर्ज केला होता. त्यानुसार महापालिकेने कारवाई देखील केली होती. महापालिकेने कारवाई केल्याने त्याचा राग मनात धरून अक्षय सब्बन याने त्याच्या पाच साथीदारासह कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला होता.

या संदर्भात शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात 324,341,323 कलमासाह गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुलकर्णी यांना लोखंडी रॉडने माराहाण करण्यात आल्याने त्यांना उपचारार्थ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्यामध्ये कलम 307 चा वाढीव गुन्हा दाखल केले होते.

दरम्यान पोलिसांनी शहरातील कोंड्यामामा चौक येथे आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये अक्षय सब्बन, चैतन्य सूडके आणि एक अल्पवयीन अशा एकूण तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत.

Leave a Comment