मेष : तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील. मात्र, मित्रांची निवड काळजीपूर्वक करा.
वृषभ : सावधनता बाळगा, कोणाकडून तरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे.
मिथुन : व्यापारात नफा झाल्यामुळे व्यापार्यांच्या चेहर्यावर आनंद आणू शकतो. कौटुंबिक कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ.
कर्क : अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतीधैर्य खचेल. संयमाने घेणेच तुमच्यासाठी उचित ठरेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते.
सिंह : आज तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल.
कन्या : तुम्हाला व्यक्त होण्यासाठी सध्याचा अतिशय चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. त्याचा तुम्हाला लाभ संभवतो.
तूळ : तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी इतरांचे नेतृत्व करा. प्रामाणिकपणाने काम करण्याच्या तुमच्या पद्धतीमुळे तुमची प्रगती होईल. दिवस चांगला.
वृश्चिक : आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधणे उत्तम. तसे केले तर हे लोक तुम्हाला तुमच्या भविष्याची दिशा दाखवतील.
धनु : मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. भावनेच्या आहारी न जाणे तुमच्यासाठी योग्य.
मकर : तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका. तसे केले नाही तर तो मानसिक आजार बनण्याचा धोका संभवतो. तुम्ही धर्मादाय कार्यात स्वत:ला झोकून द्या.
कुंभ : धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस फारच चांगला आहे. आज तुम्हाला अचानकपणे धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
मीन : तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. तुमचे व्यक्तिमत्त्व आज एखाद्या मनमोहक अत्तरासारखे काम करील
