राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके या सुजय विखेंच्या विरोधात लोकसभेला लढणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विखेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या नवरात्र उत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडून महिलांना मोठा देवी यात्रा घडवली जात आहे. यानिमित्त शेवगाव-पाथर्डी मतदार संघात लावण्यात आलेल्या पोस्टरवर पहिल्यांदाच राणी लंके यांचा फोटो झळकले आहे. त्यामुळे राणी लंके या खासदारकीला उभे राहणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.
आमदार निलेश लंके हे पारनेर मतदारसंघ सोडणार नसल्याने विखेंच्या विरोधात आपल्या पत्नीला लोकसभेच्या मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. तर या संदर्भात राणी लंके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
‘कार्यकर्त्यांच्या भावना आहे की मी खासदारकी लढवावी. तसेच त्यांच्या भावना आहे म्हणून त्यांनी माझे पोस्टरवर फोटो लावले. मात्र, पक्षाचा जो काही आदेश येईल, त्यानंतर आम्ही खासदारकी लढवण्याचं ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
