दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुबंईतील माटुंगा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. प्रदीप टेमकर असं माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांचं (ACP) नाव आहे.
प्रदीप टेमकर हे निवृत्तीनंतर माटुंगा पूर्व परिसरातील गंगा हेरिटेट या इमारतीत वास्तव्यास होते. याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून टेमकर यांनी उडी मारली. टेमकर यांनी नैराश्येतून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांना आहे.
प्रदीप टेमकर हे पत्नी आणि दोन मुले यांच्यासोबत राहत होते. सोमवारी संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास टेमकर घरी एकटे होते. त्यावेळीच त्यांनी आत्महत्या केली. २०१४ साली वाहतूक विभागातून ते निवृत्त झाले होते. माटुंगा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
